*केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल तसेच खत, दरवाढ केल्याने तुळजापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर निषेध*
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, तसेच खत दरवाढ करून सामान्य नागरिकांना अडचणीत आणले, या सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात तुळजापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून गांधीगिरी पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक तुळजापूर येथे पेट्रोल पंपावर नागरिकास व ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध नोंदवला, यावेळी श्री गोकुळ तात्या शिंदे विधानसभा अध्यक्ष तुळजापूर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, विद्यार्थी मराठवाडा उपाध्यक्ष स्वप्निल माने, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, अमर चोपदार, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष मकसूद शेख, गोरख पवार, महेश चोपदार,राष्ट्रवादी युवक तुळजापूर, उपाध्यक्ष समाधान ढोले, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष, विकी घुगे, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, कार्याध्यक्षा अमोल शिंदे, समर्थ पैलवान,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा