Breaking

सोमवार, १० मे, २०२१

ढवळस येथील कोविड कॅम्प मध्ये दोनशे व्यक्तींना लसीकरण....



ढवळस येथील कोविड कॅम्प मध्ये दोनशे व्यक्तींना लसीकरण......।।
 बेंबळे। प्रतिनिधी।                     फोटो 

       वृत्तांत असा की करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या ढवळस, भोगेवाडी, पिंपरी -जाखले या परिसरातील नागरिकांच्या साठी ढवळस येथे आयोजित केलेल्या कोवीड कॅम्पमध्ये दोनशे व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. या कॅम्प चे उद्घाटन पिंपरी चे सरपंच विक्रम उरमुडे यांच्या हस्ते  झाल्यानंतर दिवसभर अतिशय शिस्तबद्ध रीतीने सायंकाळपर्यंत दोनशे नागरिकांनी लसीकरण करून घेतले. याप्रसंगी तालुका प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन ढवळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते .कॅम्प मध्ये सोशलडीस्टंन्स, सँनेटरायझेशन,  स्वच्छता आधी सर्व बाबीचे काटेकोर पालन करण्यात आले. सरपंच उज्ज्वला शिंदे, उपसरपंच मीना गव्हाणे, डॉक्टर युवराज गव्हाणे, अमर इंगळे, तात्या मंगवडे ,अण्णा काळे आदी मान्यवरांनी कॅम्प साठी विशेष परिश्रम घेतले. आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने उर्वरित नागरीकांना देखील कोरोना लसीचे आयोजन लवकरच करण्यात येईल अशी माहिती अभ्यासू मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते व माजी सरपंच संतोष दादा अनभुले यांनी याप्रसंगी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा