Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी-संतोष अडकीने पाटीलआजपर्यंत एकनिष्ठेने केलेल्या कामाची पावती -संतोष अडकीने पाटीलनवनियुक्त निवडीचे नियुक्ती पत्र देऊन प्रदेशाध्यक्षांणी केली घोषणा...



राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी-संतोष अडकीने पाटील

आजपर्यंत एकनिष्ठेने केलेल्या कामाची पावती -संतोष अडकीने पाटील

नवनियुक्त निवडीचे नियुक्ती पत्र देऊन प्रदेशाध्यक्षांणी केली घोषणा...

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.व भारतातील ९० टक्के जनता ही कृषी व कृषी आधारित व्यवसायावर अवलंबून आहे.वास्तव आपण संघटनेचा राज्य जिल्हा तालुका गाव स्तरावर वाढ व विकास शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असाल अशी अपेक्षा संघटनेकडून करण्यात आली...

किनवट माहूर सारख्या अति दुर्गम भागात बामसेफ च्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र ज्यांनी काम केलं व अविरत करत आहेत.असा एक सर्व सामान्य माणसाच्या हाकेला धावून येणारा मा.वामन मेश्राम साहेबांच्या वैचारिक तालमीतील घडलेला कार्यकर्ता सतत 10 वर्षा हुन अधिक काळ संघटनेत वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम पाहिलं घरात कोणताही राजकीय वारसा नसतांना देखील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत किनवट माहूर मतदारसंघातुन बहुजन मुक्ती पार्टी पक्षाची उमेदवारी घेऊन निवडून रिंगणात उतरले.संघटनेत व पक्षात एकनिष्ठ राहिलेला कार्यकर्ता संतोष अडकीने पाटील ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची राष्ट्रीय किसान मोर्चा नांदेड जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा