Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

पालकमंत्री मुश्रीफ यांचा प्रहार अपंग संघटनेच्या वतीने छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार.....



पालकमंत्री मुश्रीफ यांचा प्रहार अपंग संघटनेच्या वतीने छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार.....
श्रीगोंदा:नितीन रोही,

तालुक्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता त्यावरील उपाययोजना, कोविंड सेंटर्स तसेच प्रशासकीय यंत्रणेची सद्यस्थितीबाबत आढावा  बैठकी साठी अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ आले असता त्यांना छत्रपती शिवजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे आणि सुरेश गलांडे यांनी केला.
यावेळी उपस्थित जिल्ह्याअधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी स्वाती धाबाडे मॅडम, तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार योगिता ढोले,पंचायत समितीचे बीडीओ प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, वीज वितरण कंपनीचे चौगुले साहेब व हर्ष साहेब,भूमी अभिलेखचे गोसावी साहेब,दुय्यम निबंधक कार्यालयाचे पालवे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंपळकर साहेब,महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा,आमदार बबनराव पाचपुते,राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस,माजी आमदार राहुल जगताप,नगरपालिकेचे नगरसेवक मनोहर दादा पोटे, जि.प.मा. सदस्य अनिल ठवाळ,हरिदास (आबा) शिर्के, स्मितल भैया वाबळे, संजय आनंदकर सर,भाजपा अध्यक्ष संदीप नागवडे,शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दुतारे सह तालुक्यातील सामाजिक, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा