राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तहसीलदार व मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन....
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे कि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे
तालुकाध्यक्ष संदिप उमाप यांनी तहसीलदार प्रदीप पवार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
तरी निवेदनात म्हंटले आहे की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रभागनिहाय लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावेत तसेच पेट्रोल पंपावर पेट्रोलची सुविधा 11 पर्यंत करण्यात यावी. लसीकरण नोंदणीची अट रद्द करून लसीकरण केंद्रावर नागरिकांचे नावे नोंदवण्यात येऊन त्यांची शासनातर्फे ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तातडीने प्रभागनिहाय विषाणू नाशक फवारणी(सॅनिटायझेशन) करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले..सध्या कोरोनाचा काळ सुरू असून श्रीगोंदा शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.तसेच बरेचसे रुग्ण त्यांच्या त्यांच्या घरामध्ये विलगिकरणामध्ये आहेत त्यामुळे शहरामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहेत.तरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तातडीने प्रभागनिहाय विषाणूनाशक फवारणी करण्यात यावी असे म्हंटले आहेत तसेच सध्या कोरोनाचा काळ सुरू असून त्याच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.श्रीगोंदा शहरामध्ये लसीकरण केंद्र एकच असून लसीकरण करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.लसीकरणाची नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असून वृद्ध नागरिकांना सुद्धा याचा फटका बसत आहे.लसीकरणासाठी नागरिक एकाच ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे नागरिकांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका निर्माण झालेला आहे.त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण प्रभाग निहाय लसीकरण केंद्र उभारून नागरिकांचे लसीकरण करावे म्हणजे जास्त गर्दी होणार नाही व संसर्गाचा धोका देखील टळू शकेल तसेच शहरामध्ये टाळेबंदी असून शहरातील पेट्रोलपपं देखील बंद आहेत त्याचा परिणाम रोजचे दूध विक्रेते,भाजीपाला वाहन करणारे तसेच सामान्य नागरिक यांचेवर होत आहे..अत्यावश्यक गोष्टीसाठी पेट्रोल उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.घरात एखादी व्यक्ती आजारी पडली तर दवाखान्यात नेण्यासाठी देखील पेट्रोल अभावी गाडी उपलब्ध होत नाही तरी या गोष्टीचा विचार करून पेट्रोलपंप सकाळी ११.०० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावा.तसेच लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची अट टाकलेली असून बरेच नागरिकांना सदर नोंदणी प्रक्रियेची माहिती नाही तसेच बऱ्याच लोकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत व सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईनची कामे करणारे शॉप देखील बंद आहेत त्यामुळे लसीकरण केंद्रावर आलेल्या नागरिकांची माहिती ऑफलाईन पद्धतीने गोळा करून नंतर ती कर्मचार्यांमार्फत ऑनलाईन भरावी जेणेकरून नागरिकांना या ऑनलाईन लसीकरणाच्या किचकट प्रक्रियेचा समाना करावा लागणार नाही असे निवेदन तहसीलदार नसल्याने प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार डॉ योगिता ढोले यांच्या कडे देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदिप उमाप शहराध्यक्ष राहुल बागे, कार्याध्यक्ष जितेंद्र पाटोळे, शहर उपाध्यक्ष निखिल पाटोळे,शहर उपाध्यक्ष मानव जाधव, तालुका सचिव शैलेंद्र सांगळे, निलेश घोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा