ईद निमित्त राठोड मित्र मंडळाच्या वतीने किट चे वाटप.
सोनपेठ /परभणी
[प्रतिनिधी/ राजकुमार मुंडे
मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्त राठोड मित्र मंडळाच्या वतीने गुरूवारी नगरसेवक अँड.श्रीकांत विटेकर यांच्या हस्ते शहरातील मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक वस्तू ,अन्नधान्य किट व मास्क चे वाटप करण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्या वतीने रमजान महिन्या निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असे परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद निमित्त शहरातील सोनखेड येथून किट चे वाटपास सुरुवात करण्यात आले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ शहरातील सर्व गरजू नागरिकांना ३००० किट व मास्क चे वाटप करण्यात येत असल्याची माहिती नगर परिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांनी दिली.
यावेळी नगरसेवक शेख युनूस, जिलानी खुरेशी, रमाकांत राठोड, उस्मानबाबा कुरेशी, निलेश राठोड लक्ष्मीकांत कांदे लक्ष्मण खरात ,मलिक बागवान,मारोती रंजवे,कल्पेश राठोड,शेख नयुम, विपुल राठोड. शेख शकील साहेबराव राठोड, शेख मेहबूब, शेख इलाही, शेख बाशामियाँ, शेख मुस्ताक, राजेभाऊ राठोड,शेख नसीर, शेख मुस्तफा शेख इरफान,रंगनाथ पवार,बाबासाहे पवार,परमेश्वर घुगे,शेख ईब्राहीम,शेख अफसरभाई आदी उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा