Breaking

शनिवार, १५ मे, २०२१

अखेर बनपूरी येथे विलगीकरण कक्ष सुरू*



*अखेर बनपूरी येथे विलगीकरण कक्ष सुरू*




वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

          बनपूरी व परिसरातील कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेटिलेटर सोडा साधा बेड मिळत नाही. त्यामुळे लोकांची पळापळ होत असल्याने गावातच प्राथमिक उपचार लोकांवर करून नागरिकांना कोरोना मुक्त करण्यासाठी बनपूरी ग्रामस्थ व युवक मित्रांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
           या ठिकाणी परगावाहून आलेले ग्रामस्थ, ज्यांना अजिबात कोरोनाचे लक्षणे नाहीत असे ग्रामस्थ, तसेच हायरिस्क मधील ग्रामस्थांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखले जाऊ शकते. रूग्णांवर देखरेख करण्याकरिता आरोग्यसेवक व तरुण मित्रांच्या सहकार्याने औषधे, ऑक्सिजन मशीन उपलब्ध केले असून कोविड रुग्णांना ने-आण करण्याकरिता नामदेव देवकर यांनी स्वःताची चारचाकी उपलब्ध करून दिली आहे.
            या विलगीकरण कक्षाची पाहणी करण्याकरिता खटावचे तहसिलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.युनुस शेख, आरोग्य अधिकारी श्री.निंबाळकर, ग्रामसेवक श्री. बोराटे, सरपंच रवि कांबळे, उपसरपंच तानाजी देवकर, मा.सदस्य आनंदरावशेठ देवकर ( मसूरकर ), पोलीस पाटील अमोल चव्हाण यांनी पाहणी केली.
         यावेळी चंद्रकांत देवकर, अमर पाटोळे, भरत कुंभार, रविंद्र लोखंडे, हिंदुराव देवकर, शंकर देवकर, अमोल देशमुख, बंटी चन्ने, अक्षय शेवाळे, विठ्ठल देवकर, मनोज शेवाळे, विलास देवकर, नितीन देवकर, हर्षल शिंदे, मनोज गुरव, सागर शिंदे, मधुकर कांबळे, महेश चव्हाण, कल्पेश कणसे, अमित कांबळे आदिसह ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा