*तुळजापूर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळा, सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीसाठी, शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
तुळजापूर येथील पुन्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा (मुर्ती) सुशोभिकरण लवकरात लवकर चालु करून अश्वरूढ पुतळा बसविण्यात यावा म्हणुन तसेच राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मुर्तीची रंगरंगोटी करून व परिसर डागडुजी करणे बाबत . जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन देण्यात आले . या वेळी जिल्हाधिकारी साहेबांनी येत्या एक.दोन तारखेला प्राधिकरणाची बैठक घेऊन कामास मंजुरी देण्यात येईन असे सांगण्यात आले.
या वेळी शिवबाराजे प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंके ,विकास वाघमारे,नितीन जट्टे,ओंकार पवार उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा