*कुर्डुवाडीत दोन अनधिकृत व बेकायदेशीर लॅबवाल्यांचा नंगानाच चालूच...*
*चार दिवस ठेवला आणखी एका कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांचा रिपोर्ट...कोरोनो सुपर स्प्रेडरला व वाढत्या मृत्यूंना अनधिकृत लॅबवाले व संबंधित डॉक्टर्सच जबाबदार?*
*लॅबवाल्याविरुध्द केव्हा फौजदारी दाखल होणार? नागरिकांचा सवाल? अधिका-यांची मिलीभगत शहरवासीयांचा अंत कुठवर पहाणार?*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*तीन दिवसांपूर्वी कुर्डुवाडीकरांनो सावधान... लॅबवाल्यांविरुध्द आवाज उठविल्यानंतर त्यांनी झाकून ठेवलेले व राजरोसपणे हिंडणारे एक एक रोजच कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण बाहेर येऊ लागल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा काय करित आहेत?असा प्रश्न उपस्थित होत असून अनधिकृत लॅबवाल्यांच्या नंगानाचीला कोण रोखणार?असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.*
*"विशेष बुलेटिन"च्या सत्यतेतून टेंभुर्णी रोडवरील एका कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांचा पर्दाफाश केल्यानंतर तो चक्क चार सहा दिवस बेकायदेशीरपणे मेडीकल दुकान चालवत होता. गुन्हा नोंदविण्यात आला.पुढे कांहीही दक्षता घेतली गेली नाही.अन सगळ्या यंत्रणानाच उघड्या पडत चालल्या.झाकाझाकी, टोलवाटोलवीत अनधिकृत लॅबवाले व संबंधित डॉक्टर्स हात धुवून घेत आहेत.*
*या प्रकरणानंतर दुसरे एक प्रकरण उघडकीस आलेने पुन्हा सर्वांचा नंगानाच वेशीवर टांगला आहे.*
*८ मे शनिवारी एका रुग्णाने टेंभुर्णी रोडवरील मुस्कान लॅब मध्ये तपासणी केल्यानंतर तो त्याच दिवशी कोरोनो पाॅझीटीव्ह आढळून आला होता.*
*परंतु त्याला तर वा-यावरच सोडण्यात आले असल्याचे दिसून येते.८ मे ते १२ मे पर्यंत त्याचा रिपोर्टच गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता.अखेर तो चव्हाट्यावर आणल्यानंतर सर्वांची पळता भुई थोडी झाली आहे.१२ मे रोजी रात्री तक्रारीनंतर तो पुढे आणण्यात आला.*
*रिपोर्ट का दडविण्यात आला? याबाबत कुणीही खुलासा करायला तयार नाही.असे किती रिपोर्ट दडविण्यात आहे आहेत? अन् त्याचा शोध कोण घेणार?न.पा.प्रशासन व ग्रामीण रुग्णालय एकमेकांकडे नुसते टोलवाटोलवी करुन नागरिकांच्या जिवाशी खेळ करित असल्याने नागरिकांत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*याबाबत चौकशी करता टेंभुर्णी रोडवरील अनेकांचे हात यात गुंतल्याचे सांगण्यात येत आहे.*
*वरिष्ठ अधिकारी जाणीव पूर्वक फोन उचलत नाहीत किंवा टाळत आहेत.कारण त्यांची रोज एक अंडीपिल्ली बाहेर येत आहेत.*
*अनधिकृत खाजगी लॅबवाल्यांच्या व त्यांच्याशी संबंधित डॉक्टर्सच्या बेजबाबदार कारभाराबाबत कुणी लक्ष देणार आहेत की नाही?का कुर्डुवाडी शहराची स्मशानभूमी झाल्यावरच लक्ष देणार आहेत?असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्यावेळी तेही त्याचाच एक भाग असणार आहेत हेही त्यांच्या कसे लक्षात येत नाही?*
*पोलिस खात्याच्या धाडसत्रानंतर नागरिकांचे त्यांच्या कारवाईकडे लक्ष वेधले आहे तर सोलापूरचे वैद्यकीय अधिकारी लालफितीत अडकून बसले आहेत.*
*अनधिकृत लॅबवाल्यांच्या तपासण्या तातडीने बंद करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी सर्व नागरिकांची रास्त मागणी आहे.*
*हरामखोर वैद्यकीय रॅकेटवाले व लॅबवाल्यांनो व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी किती पैसा कमवायचा तेवढा कमवा पण नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्याचा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवाल प्रतिनिधींशी जेष्ठनागरिकाने व्यक्त केला आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा