Breaking

गुरुवार, १३ मे, २०२१

तुळजापूर येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने परिचारिका दिनानिमित्त परिचारिका व परिचारक यांचा सत्कार करण्यात आला*



*तुळजापूर येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने परिचारिका दिनानिमित्त परिचारिका व परिचारक यांचा सत्कार करण्यात आला*
आज दिनांक..१२ मे म्हणजेच परिचारिका दिवस..
आजच्या कोरोनाच्या भीषण संकटात न घाबरता, न डगमगता, स्वतःच्या जीवाची काळजी न करता कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारी व्यक्ती म्हणजेच परीचारक/परिचारिका यांचा आज दिवस...
या निमित्ताने तुळजापूर येथील कोव्हीड सेंटर तथा  उपजिल्हा रुग्णालय येथे सर्व परीचारक /परीचारिका यांचा परीचारिक दिनानिमित्त तुळजापूर तालुक्याचे   विद्यमान मा.आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी सत्कार केला तथा कोविढ परिस्थितीचा आढावा घेतला..
यावेळी उपस्थित नगराध्यक्ष श्री सचिन रोचकरी, श्री आनंद कंदले, श्री विशाल रोचकरी, विनोद पीटू गंगणे, विजय आबा कंदले, वैद्यकीय अधिकारी डॉ चंचला बोडके तथा डॉ जाधव सर ..
यावेळी पिण्याचे पाणी व जेवणाची चौकशी करण्यात आली असून सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले, यावेळी
स्वतः आहार प्रमुख श्री दिनेश सूर्यवंशी यांनी पेशंटना दिल्या जाणाऱ्या दैनंदिन आहाराविषयी आमदार यांना माहिती दिली.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा