*गणेश चिवटे यांचेकडून रमजान ईद निमित्त मोफत दूध वाटप*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
सालाबाद प्रमाणे भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्यामार्फत पवित्र महिन्यातील रमजान ईद निमित्त करमाळा शहरात दोन हजार लिटर मोफत दूध वाटप करण्यात आले.
दिनांक 13 मे रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी जिल्हा सरचिटणीस
किरण बोकण ,तालुका सरचिटणीस सुहास घोलप ,तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील आदीजण उपस्थित होते ,
यावेळी गणेश चिवटे म्हटले की कोरोना काळात मुस्लिम बांधवांची दुधासाठी भटकंती होऊ नये व शहर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी प्रत्येकी तीन लिटर दूध योग्य ती काळजी घेऊन पोहोच केले आहे ,दुधाचे वाटप सुमंतनगर ,रंभापुरा ,
कानाडगल्ली ,मोहल्ला, खाटीक गल्ली, राशीन पेठ, गवंडी गल्ली, फंडगल्ली ,कुंभारवाडा ,डवरी गल्ली आदी परिसरात करण्यात आले,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा