Breaking

गुरुवार, १३ मे, २०२१

पोथरे येथे संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न*


*पोथरे येथे संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

     पोथरे ता करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे आयोजन पोथरे येथील युवा ग्रुप तसेच बार्शी येथील श्री भगवंत रक्तपेढी यांच्या वतीने करण्यात आले होते. सद्यस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे युवा ग्रुपचे सदस्यांनी सांगितले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी युवा ग्रुपचे हरिश्चंद्र दादा झिंजाडे,  हरिभाऊ हिरडे,  राज झिंजाडे , ग्रामपंचायत सदस्य, रघुवीर जाधव, संतोष ठोंबरे, शांतीलाल झिंजाडे, अवीन पाटील, अंगद देवकाते, सत्यम झिंजाडे, गिरीश झिंजाडे निखिल झिंजाडे. कृषी अधिकारी नितीन जाधव ,संदीप रोडगे करमाळा, तुकाराम नायकोडे, रवींद्र शिंदे, आदी कार्यकर्त्यांसह रक्तदाते उपस्थित होते. या शिबिरासाठी गावातून उत्फुर्त सहभाग दिसून आला. या रक्तदान शिबीरात माजी सरपंच सौ. जयाताई हरिश्चंद्र झिंजाडे, विद्यमान सरपंच धनंजय (काका) झिंजाडे यांनीही रक्तदान केले. यावेळी श्री भगवंत रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, अमोल नवले, किरण कोतमिरे, शबाना पठाण, आकांक्षा कदम यांनी रक्तदान संकलनासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा