लोहा तालुक्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित...
संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट यांचा आंदोलनाचा इशारा...
उठ बळीराजा जागा हो,आंदोलनाचा धागा हो...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांवर पीकविम्या साठी गेल्या दोन वर्षांपासून अन्याय होत आहे.नांदेड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्यांमध्ये पिक विमा भेटतो आणि जाणिव पुर्वक लोहा तालुक्याला पिक विम्यापासुन वंजीत ठेवलं जातं.ऑक्टोबर महिन्यात लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.शेतकऱ्यांच्या शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले.यात प्रामुख्याने कापूस सोयाबीन मुग उडीद ज्वारी पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले.शासनाचे सर्व अधिकारी पावसाळ्यात येऊन शेताची पाहणी करून गेले.नुकताच नांदेड जिह्यात पिक विमा मंजूर झाला आहे.परंतु पिक विमा कंपनीने पिक विमा मंजूर करतांना लोहा तालुक्यावर अन्याय केला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.तेव्हा लोहा तालुकाच कमी आणेवारी मध्ये का येतो.असा सवालही यावेळी त्यांनी केला.
सततच्या नापिकीमुळे,कधी अधिक पावसामुळे तर कधी पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल होत चालला आहे.लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होतोय की काय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये येत आहे.प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन शेतकरी राजा वर झालेला अन्याय दूर करावा.लोहा तालुक्यातील एक शेवटचे टोक म्हणजे उमरा सर्कल तालुक्यापासून 50 कि मी अंतरावर आहे.तर कंधार तालुक्यातील दिंडा-गुंडा गावचे शेत व आमचे शेत धुऱ्याला धुरा लागून अगदी जवळ आहे.तर कंधार तालुका म्हणून तीथे पिक विमा भेटतो आणि आम्ही लोहा तालुक्याचे म्हणून आमच्या येथील शेतकऱ्यांवर अन्याय होतो.हा दुजाभाव नाही का ? शेतकरी अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे ओल्या दुष्काळा मूळे अडचणीत आहे.आणि आतातर खतांचे भाव गगनाला भिडले आहेत.शेतकऱ्यांनी वाचाव की मरावं हे आता मायबाप सरकारने सांगावं.
ज्या पिक विमा कंपनीने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्या पासुन वंचीत ठेवण्याचं कट कारस्थान केले त्यांच्यावर खडक कारवाई करावी.आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा मिळुन द्यावा.अन्यथा तहसील कार्यालय लोहा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल.व यात काही हनी झाली तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा