Breaking

शनिवार, १५ मे, २०२१

शंभू शासन प्रतिष्ठाण च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती फळे, मास्क, अंडे , सॅनिटायझर च्या वाटपाने संपन्न*



*शंभू शासन प्रतिष्ठाण च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती फळे, मास्क, अंडे , सॅनिटायझर च्या वाटपाने संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी अमोल भोसले यास कडून
                  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले असे धर्मवीर संभाजीराजे यांचा जयंती उत्सव टेंभुर्णी येथे व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून तसेच *कोविड-१९ च्या साथीमुळे टेंभुर्णी परिसरातील कोरोना विलगिकरण कक्षात असलेल्या लोकांना सामाजिक बांधिलकी म्हणून शंभू शासन प्रतिष्ठाण च्या वतीने फळे, अंडी, मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून संपन्न झाला.* सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या विषाणू ने धुमाकूळ घातला आहे, त्या COVID-19 ला रोखण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात आहेत, या विषाणूचा जास्त प्रसार होऊ नये म्हणून शंभू शासन प्रतिष्ठाण चा हा एक छोटासा प्रयत्न म्हणून २०२० व त्याच बरोबर २०२१ साली सुद्धा शंभुशासन प्रतिष्ठान च्या वतीने साजरी करण्यात येणारी *छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक साजरी न करता आपल्या घरीच व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून साजरी करून व फळे, अंडी, मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून सोशल डिस्टन्स ठेवून कोरोना वरती मात करण्याचा प्रयत्न करण्यात आला.*
                            *घरी राहा सुरक्षित राहा* व *माझे कुटुंब माझी जबाबदारी* या हॅशटॅग ने कोरोनाबद्दल प्रतिष्ठाण च्या वतीने समाज प्रभोधन करण्यात आले. त्याचबरोबर कोरोना बद्दल सोशल डिस्टन्स चे पालन करून, *स्वदेशी भारत, आत्मनिर्भर भारत* बनवण्याचा ही संकल्प करण्यात आला.
                      यावेळी अमोल सरडे सर, प्रज्वल पाटील, अविनाश भोसले, दीपक पाटील, प्रमोद ननवरे सर, रोहित थोरात, ओंकार रावळ, हनुमंत तावरे, रणजित जगताप, खुशाल फुगे, वैभव लोंढे, दिग्विजय पाटील, साईदिप यादव, गगन भराटे, सौरभ बागल, पवन ढवळे,आदी. कार्यकर्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा