Breaking

सोमवार, २४ मे, २०२१

पटवर्धन कुरोली येथील कोव्हिड सेंटरला रणजितसिंह शिंदे यांचेकडून गोळ्या-औषधे


पटवर्धन कुरोली येथील कोव्हिड सेंटरला रणजितसिंह शिंदे यांचेकडून गोळ्या-औषधे

टेंभुर्णी / प्रतिनिधी- सध्या माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघात अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयात गरजेनुसार आमदार बबनदादा शिंदे व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या पुढाकारातून व सहकार्याने कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आली आहेत त्याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आरोग्य विषयक सुविधा,गोळ्या-औषधे व आधुनिक उपकरणे दिली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील कोव्हिड सेंटरला जिल्हा परिषद सदस्य तथा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या माध्यमातून गोळ्या-औषधे सुपुर्त केली आहेत.

याठिकाणच्या सध्या कोरोना रुग्णावर व्यवस्थितपणे उपचार सुरू आहेत तसेच कोव्हिड सेंटरला लवकरच पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व आमदार बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गरजेनुसार दिली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते नागेश उपासे यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी युवानेते नागेश उपासे, ग्रामसेवक गिड्डे भाऊसाहेब,तलाठी गवळी भाऊसाहेब,सरपंच गणेश उपासे,ग्रामपंचायत सदस्य दीपक नाईकनवरे,हरी पाटील,आशा वर्कर आरोग्यसेवक,आरोग्यसेविका व कोव्हिड सेंटरमधील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा