Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आॅक्शिजनयुक्त तीस बेडचे होणार सेंटर...* *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिपकुमार ढेले यांची भेट...* *आमदार संजय मामा शिंदे व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांचे प्रयत्नाला यश...



*कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आॅक्शिजनयुक्त तीस बेडचे होणार सेंटर...*


    *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिपकुमार ढेले यांची भेट...*
  
   *आमदार संजय मामा शिंदे व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांचे प्रयत्नाला यश...*


 *✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*

       *कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिपकुमार ढेले यांनी तातडीची धावती भेट देऊन कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करण्यासाठी महत्त्वाचें नियोजनात्मक आदेश जागीच दिले.*
       *शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास श्री.ढेले साहेब यांनी ग्रामीण रुग्णालयातील जागा,वैद्यकीय साधने व सुविधा पाहिल्या.*
    *उपलब्ध जागा व सुविधा पहाता ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक व बालकांसह आॅक्शिजनयुक्त डि.सी.एच.सी.कोविड सेंटर उभे करण्याचे पूर्व तयारी करून नियोजनात्मक मार्गदर्शन केले.*
    *याबाबत अधिक माहिती घेतली असता तीन वार्डामध्ये  प्रत्येकी दहा प्रमाणे तीस बेडचे आॅक्शिजनयुक्त  सेंटर उभे रहाणार असल्याचे नियोजन करण्यात आलेने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.*
      *याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका सुनंदा रणदिवे,जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भूसारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात यांच्याशी आॅक्शिजनयुक्त बेड कशाप्रकारे तयार करावयाचे, आॅक्शिजनप्लांट कुठे बसवायचे, सर्व बेड्सला आॅक्शिजनयुक्त लाईन टाकणे आदी बाबींची सविस्तर चर्चा करून तातडीने  सेंटर उभे करण्याची पूर्व तयारी करण्याचे आदेश दिले.*
     *याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका सुनंदा रणदिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रद्युम्न सातव,डॉ.प्रसन्न शहा, समुपदेशक कमरगनी तांबोळी व सर्व स्टाफ उपस्थित होता.*
       *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिपकुमार ढेले यांच्या पथकांनी माढा ग्रामीण रुग्णालयासही भेट देऊन आॅक्शिजनप्लांट उभे करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.*
      *एक महिन्यापूर्वी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभे करण्यासाठी पुढाकार घेऊन निवेदन दिले होते.आमदार संजयमामा यांनी लगेच दूरध्वनीवरून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर बोलणी करुन तातडीने कोविड सेंटर उभे करण्यासाठी कळविले होते.जेष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनीही सर्वं वरिष्ठांशी सातत्याने बोलणी करुन व विशेष बुलेटिन द्वारे पाठपुरावा केला होता.*
       *रिपाइंचे पुढाकारावेळी कोरोनोचा प्रचंड धुमाकूळ व अधिका-यांची कार्यात्मक व्यग्रता यामुळे लगेच हालचाली शक्य नव्हत्या. परंतु त्यांचा सर्व पातळीवर पाठपुरावा सुरूच होता.* 
      *अखेरीस थोडा उशीर झाला तरीही कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात तातडीने तीस बेडचे आॅक्शिजनयुक्त कोविड सेंटर उभे रहात असल्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असून आरोग्य खात्यांचे अभिनंदन करुन धन्यवाद देण्यात येत आहेत.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा