Breaking

बुधवार, १२ मे, २०२१

नगरसेवकांची मोळी बांधत कोरोना रुग्णांना आधार - शहाजीराजे गोडसे नगरपंचायत उभारणार सुसज्ज कोरोना हॉस्पिटल



नगरसेवकांची मोळी बांधत कोरोना रुग्णांना आधार - शहाजीराजे गोडसे  

नगरपंचायत उभारणार सुसज्ज कोरोना हॉस्पिटल 
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         वडूज शहरात कोरोनाने हाहाकार माजवला असताना निद्रावस्थेत गेलेल्या नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधी, प्रशासनाला आयसोलेशन सेंटर मध्ये कोंडण्याचा इशारा दिल्यानंतर बुधवारी शहाजीराजे गोडसे यांनी पुढाकार घेत सर्व नगरसेवकांची व्रजमुठ बांधल्यानंतर वडूज येथे सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला.
      गेल्या महिन्याभरापासून वडूज शहरात कोरोनाने थैमान घातले असताना नगरपंचायतीने यावर कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. यामुळे शहरातील कोरोना पेशंटचे अतोनात हाल होत होते. यावर आक्रमक भूमिका घेत वडूज मध्ये नगरपंचायतीने सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभारले नाही तर येणाऱ्या पाच दिवसात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना  आयसोलेशन सेंटर मध्ये कोंडण्याचा इशारा विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला होता.
        यावर शहाजीराजे गोडसे यांनी पुढाकार घेऊन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवकांची मीटिंग घेऊन वडूज शहरात लवकरात लवकर कोरोना हॉस्पिटल सुरू करावे असा आक्रमक पवित्रा घेतला यावर सर्वांनी एकमत दर्शवत लवकरच वडूज मधील नागरीकांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच बरोबर जी नगरपंचायत पाच हजार फी आकारत होती त्यातून वडूजच्या नागरिकांना सूट देण्यात येणार आहे.
      दरम्यान या निर्णयामुळे वडूज शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून नगरसेवक शहाजीराजे गोडसे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वडूज मधील नागरिक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा