Breaking

बुधवार, १२ मे, २०२१

माढा मतदारसंघात विविध ठिकाणी सध्या 800 बेड व आणखी 200 बेडची सुविधा करणार- रणजितसिंह शिंदेआमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून व जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने




माढा मतदारसंघात विविध ठिकाणी सध्या 800 बेड व आणखी 200 बेडची सुविधा करणार- रणजितसिंह शिंदे
आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून व जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने


- सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग व फैलाव होत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार घेता यावेत म्हणून सध्या माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून व शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी 800 बेडची व्यवस्था केली असून लवकरच आणखी 200 बेडची व्यवस्था केली जाणार आहे त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी न घाबरता वेळेवर उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हिड सेंटर माढा तालुक्यात आहेत. ज्या त्या भागातील लोकांना त्या ठिकाणी उपचार घेता यावेत म्हणून 10 ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून त्यामध्ये 600 बेडची व्यवस्था केली आहे तर पंढरपूर तालुक्यात करकंब येथे 100 बेडची  तर माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे 110 बेडची व्यवस्था केली आहे. माढा तालुक्यात 137 ऑक्सिजन बेड व 18 व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध केली आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे 20 ऑक्सिजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर सुरू झाले असून लवकरच आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक,पंढरपूर तालुक्यातील तुंगत व माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे प्रत्येकी 10 ऑक्सीजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होणार आहे. माढा तालुक्यातील रांझणी येथे 150 बेडचे कोव्हिड सेंटर व पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथे 50 बेडचे कोव्हिड सेंटर सुरू होणार आहे.  माढा येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या 30 ऑक्सीजन बेडची सुविधा असून तेथे आणखी 30 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून तसेच शासनाचा आरोग्य विभाग आणि विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून उपयुक्त साहित्य, गोळ्या औषधे, इंजेक्शन पुरविण्यात येत आहेत. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी 15 लाख रुपये किमतीच्या 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  मशीन दिलेल्या आहेत. लवकरच आमदार फंडातून प्रत्येकी पावणेदोन लाख रुपये किमतीच्या 10 बायपॉप मशीन शासकीय कोव्हिड सेंटर व ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी देणार आहे.आजपर्यंत आमदार बबनराव शिंदे व आरोग्य विभागाच्या प्रयत्नातून शासनाकडून माढा तालुक्याला 672 रेमडिसिवीर इंजेक्शन मिळाले असून आणखी प्रयत्न सुरू आहेत. यापुढेही मागणीनुसार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व आमदार बबनराव शिंदे यांच्या फंडातून उपयुक्त साहित्य व गोळ्याऔषधे देण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

फोटो ओळी- जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा