Breaking

बुधवार, १२ मे, २०२१

कुर्डुवाडीत दोन लॅबवाल्यांना अधिकृत परवानगी असताना चार लॅबवाल्यांकडून तपासण्या कशा?* *अनधिकृत लॅबवाले व संबंधित टेंभुर्णी रोडवरील काही डाॅक्टर्सच कोरोनो सुपरस्प्रेडर?* *सगळा गोलमाल सुरूच...* *अनधिकृत लॅबवाल्यांचा धिंगाणा सुरुच तपासण्याही संशयास्पद... नागरिकांत संताप...*


*कुर्डुवाडीत दोन लॅबवाल्यांना अधिकृत परवानगी असताना चार लॅबवाल्यांकडून तपासण्या कशा?*
   *अनधिकृत लॅबवाले व संबंधित टेंभुर्णी रोडवरील काही डाॅक्टर्सच कोरोनो सुपरस्प्रेडर?*
    *सगळा गोलमाल सुरूच...*
   *अनधिकृत लॅबवाल्यांचा धिंगाणा सुरुच तपासण्याही संशयास्पद... नागरिकांत संताप...*


*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*

     *कुर्डुवाडी शहरांत कोव्हीड तपासणी करण्यासाठी दोन लॅबला अधिकृत परवानगी असताना अन्य दोन अनधिकृत लॅबवाले कोव्हीड तपासण्याने नागरिकही चक्रावले असून सगळा गोलमाल सुरूच आहे.*
    *याबाबत शासकीय पातळीवर चौकशी केली असता अधिकृतपणे असे सांगण्यात आले की श्री क्लिनिकल लॅबोरेटरी,संतोष हाॅस्पीटल,टेंभुर्णी रोड कुर्डुवाडी व समर्थ लॅब, साखरे हाॅस्पिटल माढा रोड कुर्डुवाडी यांनाच कोव्हीड तपासणी करण्यासाठी अधिकृतपणे परवानगी देण्यात आली आहे.*
    *याबाबत अधिक माहिती तपासून पाहिले असता मुस्कान लॅब साई काॅलनी व शुभम लॅब पोष्टाजवळ कुर्डुवाडी या दोन लॅबमध्ये कोव्हीड टेस्टला परवानगी नसताना त्या कशा करतात? याबाबत चौकशी करता सांगण्यात आले की,शासकीय पातळीवर यांना आम्ही परवानगी दिलेली नाही असे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अधिक्षिका सुनंदा रणदिवे यांनी सांगितले.*
    *मग हे अनधिकृत व बेकायदेशीर तपासण्या कशा करतात? याबद्दल नगरपालीकेस विचारावे त्यांना आम्ही कळविले आहे असा खुलासा करण्यात आला.न.पा.प्रशासनाकडे चौकशीचा फोन मुख्याधिकारी यांच्याकडून उचलला जात नाही.*
     *जर कुर्डुवाडीतील सर्व डॉक्टर्सना माहीत आहे की अधिकृतपणे परवानगी कुणाला आहे? तर ते त्यांना डावलून अनधिकृत लॅबवाल्यांकडे रुग्ण कसे काय पाठवतात?*
     *वर उल्लेख केलेल्या अनधिकृत दोन लॅबवाल्यांच्या तपासण्या बाबत चौकशी केली असता असे निदर्शनास आले आहे की या दोन लॅबमध्येच शंभर टक्के रुग्ण कोरोनो पाॅझीटीव्ह आढळून येत आहेत.*
   *अन्य दोन अधिकृत समर्थ लॅब व श्री क्लिनिकल लॅबोरेटरी  लॅबवाल्यांचा कोरोनो रिपोर्ट निम्म्याहून ब-याच प्रमाणात कमी  निगेटिव्ह येत आहे.मग प्रश्न असा आहे की यांचा कां रिपोर्ट शंभर टक्के पाॅझीटीव्ह येत नाही.शासकीय पातळीवरील दुस-या लाटेत बंद करण्यात आलेल्या आरटीपीसीआर तपासण्या बरेच काही सांगून जात असून*
    *मग बेकायदेशीर व अनधिकृत लॅबवाले व टेंभुर्णी रोडवरील काही डाॅक्टर्स यांचें साटेलोटेही यातून उघड होते.हेच अनधिकृत लॅबवाल्यांना हाताशी धरलेले डॉक्टर्सच कोरोनो सुपर स्प्रेडर असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातच आता लुटालूट चालू असताना उघड उघड बोलले जात आहे.*
     *सुपरस्प्रेडरच्या पार्श्र्वभूमीवर गेल्या महिन्यात पोलिसांनी धाडी टाकल्यानंतर महिना होत आला तरी सोलापूर सिव्हील हॉस्पिटलला पोलिस खात्याने विचारलेली माहिती अद्याप देण्यास टाळाटाळ केली जात आहे की कागद़ोपत्री सारवासारवी चालू आहे हेही समजून येत नाही.*
     *शुभम लॅब व मुस्कान लॅब सर्व नियम धाब्यावर बसवून डॉक्टर्सना हाताशी धरून गोरख धंदा करित असल्याचे समोर आले आहे.परवाच्या बुलेटिनच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतर चार चार दिवस रस्त्यावर हिंडणा-या पकडलेल्या कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णावरुनही व पोलीस फिर्यादीवरून स्पष्ट झाले आहे.*
      *तपा‌सणीत दामदुप्पट वसुली...पाॅझीटीव्ह आला की रुग्ण वा-यावर अन् संबंधित डॉक्टर्स व लॅबवाल्यांची चंगळवाद यामुळे सर्वत्र संताप*
    *तरीही त्यांना निलाटपणे व बेमुर्वतपणे पाठीशी घातले जात आहे याबद्दल नागरिकांबरोबरच वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.अनधिकृत लॅबवाले व संबंधित डॉक्टर्स यांची पोलिस खात्याकडून कसून चौकशी होणार कां?व कायदेशीर कारवाई होणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष वेधले आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा