Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

१३ जहाल नक्षल वाद्यांना कंठस्नान घालण्यास यश पो.उ.नि. प्रेमकुमार दांडेकर यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कडून कौतुक ..*********************************



*१३ जहाल नक्षल वाद्यांना कंठस्नान घालण्यास यश पो.उ.नि. प्रेमकुमार दांडेकर यांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कडून कौतुक ..*
********************************
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी/नितीन रोही,

श्रीगोंदा शहरा मधील गणपति मळयाचे भूमिपुत्र पोलीस उप निरीक्षक – प्रेमकुमार लहू दांडेकर(विशेष अभियान पथक प्रमुख गडचिरोली) यांनी दिनांक २१-५-२०२१ रोजी  उपविभाग एटापल्ली अंतर्गत पोमके कोटमी हद्दीतील मौजा-पैडी (गडचिरोली) जंगल परिसरात नक्षल वादी दबुन असल्याची गोपनीय माहितीदारामार्फत माहिती कळताच दांडेकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक प्रभारी म्हणून, तयार केले. त्या पथकातील जवानांना योग्य मार्गदर्शन करून तत्काळ पथकासह रवाना झाले.

सविस्तर असे की, दरम्यान पैडी जंगल परिसरात अभियान राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षत्रलवाध्यां कडून पोलीस पथकावर अंदा-धंद गोळीबारी केला असता त्यांना दांडेकर यांनी प्रत्यूतर समय सूचकता व बुद्धि कौशल्याचा वाफर करत स्वताच्या जीवाची पर्वा न करता, जोरदार व नियंतत्रीत गोळीबार करून पोलीस पथकावर भ्याड हल्ला करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव दांडेकर यांनी उधळून लावला व कोणतेही अप्रिय घटनेशिवाय १३ जहाल नक्षल वाद्यांना कंठस्नान घालण्यास यश प्राप्त केले असून यामध्ये १डीव्हिजन,१पीपीसीएम,४एसी एम व अन्य मोठ्या प्रमाणात नक्षली सहित्य हस्तगत करण्यात पथकाला यश मिळून देणे ही निश्चितच प्रशंसनीय व कौतुकास्पद बाब असून पोलीस दलाची प्रतिमा उंचावनारी आहे.
 त्यामुळे दांडेकर यांना अंकित गोयल(पोलीस अधीक्षक गडचिरोली)यांनी गौरवाचे पत्र देत शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याच बरोबर श्रीगोंदा शहराचे उप नगराध्यक्ष रमेश लाढाणे,बाजार समितिचे सचिव दिलीप डेबरे,प्रहारचे प्रथम शहर अध्यक्ष नितीन रोही,माजी नगरसेवक दादासाहेब औटी,अंबादास औटी,संभाजी बिग्रेडचे अरविंद कापसे,सुदाम दांडेकर,रेल्वे पोलीस किरण दांडेकर सह आदिंनी प्रेमकुमार यांना त्यांच्या कार्यबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा