*"लॅबवाल्या" पाठोपाठ आता दवाखान्यातील पाॅझीटीव्ह रुग्ण रस्त्यावर...*
*टेंभूर्णी रस्ता झाला "कोरोनो पाॅझीटीव्ह" रुग्णांचे पर्यटन केंद्र...कसा होणार कोरोनो कमी?*
*प्रशासन घालतंय पाठीशी अन् सर्वं सामान्य मरतोय लाखोंची भरती करुन जिवानिशी... अधिका-यांची डोळे झाक व मिलीभगत... ज्येष्ठ पत्रकारास इशारा...?*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरातील मोकाट सुटलेले लॅबवाले व संबंधित डॉक्टर्स यांच्या "सुपरस्प्रेडरां"च्या एक एक भानगडी चव्हाट्यावर येतच चालल्याने नागरिकांत तिव्र संतापच दिसून येत आहे.*
*कुर्डुवाडी शहर व परिसरातील कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण केअर सेंटरला उपचार घेतात.तर कांहीजण खाजगी डेडीकेटेड कोव्हिड सेंटरला उपचार घेतात.*
*येथे उपचार घेणा-या कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांना ना नातेवाईकांना भेटण्यासाठी परवानगी आहे.तसेच त्यांना बाहेर जाण्यासही मज्जाव आहे.*
*मात्र कुर्डुवाडीत बेफिकिर प्रशासनामुळे वरचेवर आक्रितच घडत चाललं आहे.*
*असाच एक कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण आजारपणावर उपचार घेण्यासाठी टेंभुर्णी रोडवरील दवाखान्याचा "आधार" घेतलेला.*
*उपचार तर सुरू होतेच.बिलावर बिले भरुनही रुग्णांची तहान भागली नाही असे वाटते.बुधवारी रात्री साडेआठ पाऊणे नऊच्या सुमारास त्यानें उपचारार्थ शोधलेल्या दवाखान्यातून चक्क बाहेर धुम ठोकली.*
*समोरिल रस्ता ओलांडून आपली तृष्णा भागविण्यासाठी चक्क आंतरभारती मैदानानजीकच्या दुस-याच एका दवाखान्यात शिरल्याने सर्वांचीच पाचावर धारण बसली.ह्या बहाद्दराच्या हाताला सुई-जेल्को तसेच.*
*दुसऱ्या दवाखान्यातील मेडीकल स्टाफने त्याला हटकून चौकशी केली असता पलीकडच्या कोरोनो दवाखान्यात अॅडमीट असल्याचे सांगितले.कुलरचे पाणी पिऊन आपली "तृष्णा भागऊन आंतर भारती मैदानाच्या फेरफटक्यानंतर पुन्हा कोरोनो दवाखान्यात दाखल.*
*इकडे दुसऱ्या दवाखान्यातील स्टाफची धांदल उडालेली.कुलर अन् लटकलेल्या ग्लासचे काय?त्या दवाखान्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्टाफने घडलेली घटना सांगितली.संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक प्रशासनालाही हा गंभीर गैरप्रकार कळविला.*
*याबाबत परिसरातील नागरिकांशीही संबंध साधला असता कांहीं रुग्ण आंतरभारतीच्या हौदाजवळ येऊन बसतात,जेवण करतात गप्पागोष्टी करुन जातात.त्यांच्या हाताला सुई-जेल्को असतों हे आम्ही नेहमीच पहातोय.पण तक्रार कोणी करायची? वैद्यकीय क्षेत्रातील दादागिरीची भिंती?*
*आंतरभारती मैदानं कोरोनो रुग्णांचे पर्यटन स्थळ असावं असं कुत्सितपणे बोलतात.तेथेच पडलेल्या बाटल्याही बरेच काही सांगून जातात*
*रुग्णास जास्त झाले तर दवाखान्यात दाखल करण्यात येते.मग असा रुग्ण दवाखान्याच्या बाहेर कसा? दवाखान्याचे अधिकारी व सुरक्षा रक्षक काय करत होते?*
*लाखोंची बिले होणा-या दवाखान्यात शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय नाही का? असेल तर तेथील रुग्ण तृष्णा भागविण्यासाठी अन्य दवाखान्यातील कुलरवर कसा? एवढे होऊनही प्रशासन घालतंय पाठीशी...कसा होणार कोरोनो कमी? कोण कोण सुपरस्प्रेडरला जबाबदार?नागरिक धास्ताऊन व वैतागून उघड उघड नांवे घेऊ लागली.*
*लॅबवाल्याच्या व वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटच्या बेफीकीरीबाबत अनेक गोष्टींचे चर्वितचर्वण सांगावे तेवढे थोडेच.*
*यांच्या गैरप्रकारांवर वेळोवेळीच कारवाई करुन तातडीने आळा घातला तर कां होणार नाही कोरोनो कमी? नागरिकांचा व वैद्यकीय क्षेत्रातील जाणत्यांचा सवाल.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा