Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

काळी बुरशी या नवीन आजाराचे रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था करणे,:- बाळासाहेब भोसले यांची मागणी*




*काळी बुरशी या नवीन आजाराचे रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांच्या उपचाराची व्यवस्था करणे,:- बाळासाहेब भोसले यांची मागणी*

सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढाई लढत असताना, महाराष्ट्रमध्ये काळी बुरशी या आजाराने थैमान घातले आहे, साहेब आपण या बाबतीत सर्व शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड स्थापन करावेत अशा सूचना केल्या आहेत, परंतु साहेब उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय अशी कोणतीच व्यवस्था आजतागायत केलेली नाही, साहेब हा आजार गंभीर असून, काळी बुरशी या नवीन आजाराचे रुग्ण वाढत आहेत या आजाराच्या उपचाराकरिता ऑपरेशनचा खर्च, व त्यावर लागणारी इंजेक्शन व अँटी फंगल इंजेक्शन द्यावे लागतात, हा संपूर्ण  खर्च 3 ते 4 लाख  पर्यंत जाऊ शकतो, तसेच उपचारासाठी  रुग्णाला दवाखान्यामध्ये ऍडमिट करून घ्यावे लागतात, बुरशी जन्य आजाराच्या रुग्णांचा ऑपरेशन खर्च व इतर खर्च कमी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी वेगळा (स्वतंत्र ) वार्ड स्थापन करण्यासाठी आपण ताबडतोब आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, आशा आशेचे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना,व्हाईस चेअरमन बाळासाहेब भोसले तालुका खरेदी विक्री संघ तुळजापूर यांनी निवेदन दिले आहेत,

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा