Breaking

रविवार, ६ जून, २०२१

*5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन केंद्र तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली*


*5 जून जागतिक पर्यावरण  दिनानिमित्त तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने अग्निशमन केंद्र तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली*

असून,  यामध्ये जांभूळ, चिंच, कडुनिंब, आंबा,लिंब,वडाचे झाड,रामफळ,पेरु इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. शिवाय यापूर्वी केलेल्या वृक्षरोपणाचे संवर्धन करण्यात आले आहे.  तुळजापूर शहरातील नागरिकांनी आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करुन निसर्गाचा समतोल राखण्यास सहकार्य करावे असे आवाहन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्ष सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी  तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना केले असून आपल्या घराच्या परिसरातील कोणत्याही प्रकारचे वृक्ष अथवा रोपे उपलब्ध असल्यास ते अग्निशमन केंद्र येथे  स्वतःहून लावावे व त्या रोपांची संरक्षण देखभाल करण्याची जबाबदारी नगरपरिषद घेईल.  तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपणाकडे उपलब्ध असणारी रोपे वरील ठिकाणी लावून नगरपरिषदेस  सहकार्य करावे असेही आवाहन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी केले आहे.  सदर  नगर परिषद सदस्या सौ.रेशमा अविनाश गंगणे यांनी त्यांची मुलगी कु. परी अविनाश गंगणे हिच्या वाढदिवसा निमित्त दिलेल्या रोपांची लागवड नगराध्यक्षांच्या हस्ते केली कार्यक्रमासाठी  नगरसेवक पंडितराव जगदाळे युवा नेते विनोद गंगणे, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा