Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी मोलाचे कार्य केले - केंद्रप्रमुख रोहिदास कापसेश्री संत गाडगेबाबा विद्यालयात शाहू महाराजांची जयंतीनिमित्त वृक्षारोपण


छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी मोलाचे कार्य केले - केंद्रप्रमुख रोहिदास कापसे
श्री संत गाडगेबाबा विद्यालयात शाहू महाराजांची जयंतीनिमित्त वृक्षारोपण

माढा / प्रतिनिधी - कोल्हापूर संस्थानाचे लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी इतर प्रगत व उच्चभ्रू समाजातील मुलांच्या बरोबरीने तळागाळातील गोरगरीब, गरजू ,होतकरू आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्या काळात शाळा,महाविद्यालये व वसतीगृहे सुरू करुन मोलाचे योगदान दिले त्यामुळे आज गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माढा तालुक्यातील मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी केले.
ते कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण म्हणाले की,छत्रपती शाहू महाराजांचे बहुजनांसाठींचे कार्य उल्लेखनीय आहे.स्त्रीयांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी स्त्री पुनर्विवाह कायदा केला, देवदासी प्रथा बंद केली,सर्वांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक,कृषी व जलसंधारणाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाचा वारसा आजच्या पिढीने पुढे चालविला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार व छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात "एक पद एक झाड" याप्रमाणे सरपंच शिवशंकर गवळी,केंद्रप्रमुख रोहिदास कापसे व मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच शिवशंकर गवळी, ग्रामसेवक संदीप सावंत,चेअरमन वैजनाथ व्हळगळ,तुकाराम कापसे, ग्रामसेविका रेश्मा पाटील,नारायण करवर,नेताजी कापसे,भैरवनाथ गायकवाड,तनुजा तांबोळी,सुधीर टोणगे,प्रवीण लटके,शिवाजी भोगे, सचिन क्षीरसागर,सुनिल खोत,लहू गवळी,सागर राजगुरू यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी- कापसेवाडी ता.माढा येथे शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करताना सरपंच शिवशंकर गवळी, रोहिदास कापसे,औदुंबर चव्हाण व इतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा