रा गे शिंदे महाविद्यालय व संत गाडगेबाबा महाविद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
परंडा :- दि 26 जानेवारी 2021 परंडा शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय येथे सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर दीपा सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे महाविद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा संजीवन गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी परीक्षा प्रमुख प्रा डॉ प्रशांत गायकवाड ,प्रा शंकर कुटे, प्रा विजय जाधव ,कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब शिरसागर उपस्थित होते. तर संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या कार्यक्रमाच्या उपस्थिती मध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ बी वाय माने, प्रा विजय जाधव , संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे समन्वयक अनिल जानराव , प्रयोगशाळा सहाय्यक जयवंत देशमुख, तसेच भागवत दडमल, उत्तम माने ,श्रीमती कोठुळे ,आणि सतीश दळवी आदी कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रम covid-19 चे पालन करत घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा