*लसीकरणाचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा - नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी*
*******************************
*सराया धर्मशाळा कमान वेस येथे ७० जणांचे लसीकरण*
तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर दि.24 , शहरातील विविध प्रभागात प्रतिदिनी लसीकरण होत असून या लसीकरण केंद्रात जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगर परिषदचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी कमान वेस येथील सराया धर्मशाळायेथील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी एकूण नागरिकांनी लस घेतली
लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वतीने भेटवस्तू म्हणून टिफिन डबा, अल्पोपहार चहा चे वाटप करण्यात आला.
सदरील लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी , नगरसेवक पंडित जगदाळे, माजी नगराध्यक्ष गणेश कदम , माजी नगरसेवक नाना लोंढे ,अभिजित कदम, ज्येष्ठ नागरिक श्याम (भैया) क्षिरसागर, कालिदास चिवचिवे, अमर (बापू )कदम, चंद्रकांत लोंढे चिवचिवे,दिगंबर (भऊ) कदम, रुग्ण समितीचे सदस्य आनंद कंदले, न.प. कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, नानासाहेब डोंगरे, सचिन कदम,उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण प्रमुख सुलक्षणा मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात
-------------------------------------------------
*लसीकरण केंद्रावर सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती शशिकला विद्याधर पाठक वय वर्षे 85 यांनी कोवीशिल्डचा दुसरा डोस घेतला .त्याचबरोबर त्यांनी शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.*
--------------------------------------------------
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंचला बोडके, श्रीधर जाधव यांनी लसीकरण केंद्रस भेट दिली.
सदरील लसीकरण यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी व नगर परिषदचे ज्ञानोबा (तात्या) टिंगरे ,संतोष इंगळे , महेश गवळी , सहदेव हुच्चे ,शालिनी माने, भोलानाथ लोकरे, श्रीनाथ शिंदे, विनोद नेपते, गुड्डू कदम ,हणमंत पुजारी, त्यांनी परिश्रम घेतले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील आरोग्य पर्यवेक्षक पांडागळे जयप्रकाश, हिरेपठ जयप्रकाश, मस्तूद सी.एम मधुकर पवार, पवन सागावे , पठाण. एल. एम,गालफाडे, चव्हाण पार्वती यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा