Breaking

शुक्रवार, ११ जून, २०२१

टेंभूर्णी येथील हाँटेल साई पॅलेसचे लायसन्स कायमस्वरूपी रद्दराज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस


टेंभूर्णी येथील हाँटेल साई पॅलेसचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द

राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे उघडकीस

टेंभुर्णी / प्रतिनिधी-  टेंभुर्णी येथील एकाने परमिट रूम व बिअर बारसाठी संपूर्ण खोटी कागदपत्रे बनवून जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे सुनावणीत उघड झाल्याने टेंभुर्णी येथील हॉटेल साई पॅलेसचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,टेंभुर्णीतील औदुंबर अशोकराव भागवत यांनी त्यांच्या परमिट रुम व बिअर बारचे लायसन मिळविण्यासाठी टेंभुर्णी ग्रामपंचायतचा ठराव, ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला,बांधकाम परवाना व गावठाण हद्दीचा दाखला अशी कागदपत्रे स्वतः तयार केलेले शिक्के मारून व स्वतः सही करून लायसन मिळविले आहे अशी तक्रार जयवंत पोळ यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी कुर्डुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा कागदपत्राची पडताळणी अहवाल मागविला होता.याविषयीचा २३ जानेवारी २०२० व २७ जुलै २०२० असा दोन वेळा पडताळणी अहवाल पाठविण्यात आला होता.या अहवालास जयवंत पोळ यांनी हरकत घेऊन पुन्हा ५ ऑक्टोबर २०२० रोजी तक्रार करीत दोन्ही अहवाल चुकीचे असल्याचे व संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.गट विकास अधिकारी पंचायत समिती कुर्डुवाडी यांच्याकडील २१ सप्टेंबर २०२० व २० जानेवारी २०२१ रोजीच्या अहवालानुसार टेंभुर्णी ग्रामपंचायत  कडील बांधकाम परवाना,सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरी बनावट आहेत.त्यामुळे सदरचा बांधकाम परवाना बोगस असल्याचा अहवाल सादर केल्याने हॉटेल साई याचे लायसन कायमस्वरूपी रद्द होण्यास पात्र ठरते असा निष्कर्ष काढून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे नियमांतर्गत कारवाईस पात्र आहे.यामुळे या आदेशान्वये हॉटेल साई पॅलेसचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहे असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

*खोटी कागदपत्रे जोडून खोट्या सह्या करून परमिट रम व बिअर बारचे लायसन्स मिळवून फसवणूक केल्या बद्दल औदुंबर भागवत यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी व चुकीचे कागदपत्रे पडताळणी अहवाल सादर करून कार्यालयाची फसवणूक केल्याबद्दल विस्तार अधिकारी बी.टी. रेपाळ यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे जयवंत पोळ यांनी म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा