कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक - पालकमंत्री दत्तात्रय भरणे
दुसऱ्या लाटेत घट ही समाधानाची बाब
टेंभूर्णी / प्रतिनिधी - सोलापूर येथील नियोजन भवन येथे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय (मामा) भरणे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना रुग्णांच्या उपाययोजना बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे, मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रत्येक यंत्रणेने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी वर्तविली आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांच्या उपचारासाठी आवश्यक हॉस्पिटलची निर्मिती, मुबलक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.तिसऱ्या लाटेबाबत सोलापूर जिल्ह्याची तयारी उत्कृष्ट झाली आहे. मुलांना असलेला संभाव्य धोका ओळखून जिल्ह्यात १४०० बेडची क्षमता तयार केली आहे. यामध्ये १२०० शासकीय, खासगी आणि सिव्हीलमध्ये १०० साधे, ५० अतिदक्षता बेडची क्षमता तयार ठेवली आह
.जी मुले नियमित लसीकरणापासून वंचित आहेत, त्यांचे इंद्रधनुष्य अभियानामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. कुपोषित बालके, गरोदर माता आणि कोमॉरबिड रुग्ण, दुर्धर आजाराची बालके यांच्या घरातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची पुन्हा तपासणी करावी. त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण होणार नाही, याचे काटेकोर नियोजन करून दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या.जिल्ह्यात सध्या ३३७० रुग्ण उपचार घेत असून यामध्ये म्युकरमायकोसिसचे १८० रुग्ण आहेत. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी जिल्ह्यात ३२ दवाखाने आहेत. सिव्हीलमध्ये ७० तर खासगी दवाखान्यात ११० म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा