Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

खटाव तालुक्यासाठी स्वतंत्र जंम्बो कोव्हीड सेंटर सुरू करा* रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी



*खटाव तालुक्यासाठी स्वतंत्र जंम्बो कोव्हीड सेंटर सुरू करा*
रणजीतसिंह देशमुख यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

       खटाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच त्वरीत उपचार मिळण्यासाठी खटाव तालुक्यासाठी स्वतंत्र जंम्बो कोव्हीड सेंटर उभारणी करावी अशी मागणी हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक व राष्ट्रीय कॉग्रेसचे नेते रणजीतसिंह देशमुख यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
          जिल्हाधिकारी शेखरसिंह गुरुवारी खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी श्री. देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन तातडीने जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी वडूज बाजार समितीचे मा.सभापती अशोकराव गोडसे, राष्ट्रीय कॉग्रेस खटाव तालुकाध्यक्ष डॉ.विवेक देशमुख, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
        खटाव तालुक्यातील कोरोना रूग्णांचा संख्या व मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या ठिकाणी मायणी येथे फक्त ४ व्हेंटिलेटर उपलब्ध असून ऑक्सिजन सुविधा ही अपुरी आहे. त्यामुळे सातारा, कराड, कोरेगाव येथे उपचार करण्यासाठी जावे लागत असून तेथेही रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होईल याची खात्री देत येत नाही. तर प्रवासातही काही रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यासाठी स्वतंत्र कोरोना कोव्हिड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे रणजीतसिंह देशमुख यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा