*डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
एक देश मे दो विधान दो निशान प्रधान नही चलेंगेचा नारा देत अखंड भारतासाठी बलिदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक, महान शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय विचारवंत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित वडूज येथे खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.वैभव माने, वडूज शहाराध्यक्ष प्रदिप शेटे, जयवंत पाटील, प्रा.अजय शेटे, उमेश चव्हाण, वैभव पाटील, दत्तात्रय खाडे, विशाल जगदाळे, प्रविण जगदाळे, योगेश राऊत आदि कार्यकर्ते कोविड - १९चे पालन करत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.अजय शेटे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा