Breaking

बुधवार, ९ जून, २०२१

बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांचे आमदार आपल्या दारी अभियान*



*बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांचे आमदार आपल्या दारी अभियान*
*बार्शी तालुका प्रतिनिधी/ सिद्धेश्वर जाधव*

आमदार राजेंद्र राऊत यांनी कोरोना कालावधीच्या लॉकडाऊनपूर्वी म्हणजे मागील ३ - ४ महिन्यांपूर्वी बार्शी शहरात आमदार आपल्या दारी अभियान सुरू केले होते. परंतु मागील २ महिन्यांत झालेल्या लॉकडाऊनमुळे हे अभियान स्थगित करण्यात आले होते.
मागील १५ दिवसांपासून बार्शी शहरामध्ये पावसाळ्या पूर्वीची गटारी ओढे-नाले स्वच्छतेची कामे सुरू आहेत. या ३-४ दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भाग, तसेच शहराच्या हद्दवाढ भागांमध्ये पावसाच्या पाण्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
या सर्व गोष्टींचा आढावा आमदार राजेंद्र राऊत यांनी शनिवार दि. ६ जून रोजी बार्शी शहरातील बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बगले चाळ, जनसेवा हायस्कूल परिसर, बगले बरड, वाणी प्लाॅट, कॅन्सर हॉस्पिटल परिसर, चोरमुले प्लाॅट, मंगळवार पेठ परिसर या भागांना भेटी देऊन तेथील पाहणी केली. या भागातील नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित खाते प्रमुख व नगरसेवकांना सुचना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, नगरसेवक बापूसाहेब वाणी, प्रशांत कथले, प्रा.प्रकाश मनगिरे, माजी नगरसेवक अशोक सावळे, पांडुरंग वाणी, शिवाजीराव पाटील, पक्षनेते विजय नाना राऊत, पाचू उघडे, बापू जाधव, गणेश चव्हाण, संतोष भैय्या बारंगुळे, दयानंद त्रिंबके, संदेश काकडे, रोहीत लाकाळ, नगर अभियंता भारत विधाते, दिलीप खोडके, पाणीपुरवठा अभियंता अजय होनखांबे, आरोग्याधिकारी ज्योतीताई मोरे, स्वच्छता निरीक्षक दिपक काकडे, नितीन शेंडगे, शब्बीर वस्ताद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा