अनंतराव काळे याची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती अध्यक्ष पदी निवड.
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के
दि,१०,
अनंतराव काळे याची पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती अध्यक्षपदी लोकनेते , प्रहार राष्ट्रीय अध्यक्ष राज्यमंत्री, बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व शुभ हस्ते निवड करण्यात आली, या प्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राज्य प्रवक्ते अजयजी महाराज बारस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नियूक्ती झाली,
यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा व आशिर्वाद दिले, यावेळी पुणे जिल्हा संघटक , नीरजभाऊ कडू पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नंदकिशोर जगदाळे, हवेली तालुका प्रमुख महेश कनकुरे, पुणे शहर अध्यक्ष सुनिल गोरे पुणे शहर उपाध्यक्ष रोहित भोसले, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदीप जाधव,व इतर प्रकार सेवक उपस्थित होते, अध्यक्ष निवडी बद्दल अनंतराव काळे म्हणाले की, राज्यमंत्री व आमचे दैवत बच्चुभाऊ कडू यांच्या कुशल नेतृत्वाखाली व सहकारी यांच्या मदतीने पुणे जिल्ह्यात प्रभावी व लोकाभिमुख काम करणार आहे,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा