Breaking

सोमवार, ७ जून, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी सचिन होदाडे यांची निवड



राष्ट्रवादी काँग्रेसच्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी सचिन होदाडे यांची निवड 

टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी सचिन नीलकंठ होदाडे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र आज  माढा विधानसभा मतदारसंघ चे अध्यक्ष रमेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तालुका कार्यकारिणीत आमूलाग्र बदल केले असून पक्ष मजबुतीकरण करून बळकटी आणण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या निवडी आ.बबनराव शिंदे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी केल्या आहेत.
 सचिन होदाडे गेली 22 वर्षे पासुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य एकनिष्ठेने करत असून राजकारणाबरोबरच ते पत्रकारिता करतात टेंभुर्णी शहर प्रेस क्लबचे ते विद्यमान सचिव असून, रोटरी क्लबचे माजी सचिव, संजय मामा शिंदे वाचनालय, टेंभुर्णी याचे अध्यक्ष,  वीरशैव लिंगायत सभा युवक आघाडीचे शहर अध्यक्ष,आदी पदावर कार्यरत आहेत त्यामुळे राजकीय क्षेत्र  बरोबरच कला, साहित्य,  सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातही त्यांचा वावर आहे

निवडीबद्दल सचिन होदाडे यांचे आ.बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,जिल्हा परिषदेचे सदस्य बंडू नाना ढवळे,टेंभुर्णी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील ,  यांच्या सह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रमेश पाटील, तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, जि.उपाध्यक्ष दिलीप भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, युवकचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, संतोष कानडे, श्रीकांत लोंढे, गणेश भोज, पांडुरंग कानडे, योगेश भणगे फिरोज तांबोळी, समीर तांबोळी, राहुल शिवपुजे, संजय होदाडे सतीश होदाडे ,नागेश गुंगे, महादेव स्वामी, राहुल स्वामी ,मोहन पलंगे ,शिरीष होदाडे ,मंगेश ठाकूर ,सारंग होदाडे, रोहित  होदाडे, रेवन शिरसागर संतोष भोसले ,दीपक भोसले हे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा