राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी नवनिर्वाचित नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा चव्हाणवाडी येथील भोसले परिववार कडून सत्कार
टेंभुर्णी प्रतिनिधी/धनंजय भोसले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणीसाठी माढा तालुक्याचे आमदार श्री.बबनदादा शिंदे यांच्याआदेशानुसार व श्री.रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.रमेश पाटील आणि मा.संभाजी पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन निवडी करण्यात आल्या.
आज नवनिर्वाचित निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माढा तालुका उपाध्यक्ष पदी चव्हाणवाडी गावचे माजी उपसरपंच श्री. हनुमंत (आण्णा) चव्हाण यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा तालुका उपाध्यक्ष पदी चव्हाणवाडी गावचे माजी सरपंच श्री.संजय( काका) मिस्किन यांची निवड करण्यात आली.
तसेच माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष पदी टेंभुर्णीचे धडाडीचे कार्यकर्ते श्री.सचिन होदाडे यांची निवड करण्यात आली.
या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची माढा तालुका व कोंढार भागातील चांगला संपर्क आसल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.माढा तालचक्यात विविध गावातून सत्कार व अभिनंदन होत आहे.
आज चव्हाणवाडी गावामध्ये भोसले परिवारातील श्री. विष्णू(आबा) भोसले यांच्या निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांचे सत्कार मा.श्री. विष्णू(आबा) भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात यावेळी बोलताना नव्याने निवड झालेले श्री.हनुमंत चव्हाण म्हणाले की, पक्षाने जो विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरविण्याचे नक्कीच प्रयत्न करणार व गटतट न पहाता पक्ष वाढवण्यासाठी काम करणार आहे.
तसेच युवक काँग्रेसचे श्री.संजय मिस्किन बोलताना म्हणाले माढा तालुक्यातील यवकांची चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करुन युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काम करण्याची पद्धत समजावून व सर्व युवा वर्गाला,कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
टेंभुर्णी चे श्री सचिन होदाडे बोलताना म्हणाले, आमच्या पक्षाने आणि आमच्या नेत्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोच पावती म्हणून मी माढा तालुक्यात लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच पक्षाच्या हितासाठी काम करणार आहे.
या कार्यक्रमात चव्हाणवाडी चे नेते मा.अशोक(बापु) मिस्किन, सरपंच मा.सुनिल मिस्किन, ग्रा.पं.सदस्य मा.नवनाथ शिंदे,माजी सरपंच मा.भागवत खडके,मा.नवनाथ नांगरे(गुरुजी),मा.असिफ काझी,मा.सौदागर भोसले,मा.औदुंबर भोसले,मा.दिपक भोसले,मा.सुनील भोसले,मा.संतोष भोसले,मा.स्वप्नील भोसले,विशाल भोसले,संदीप भोसले,मा.रोहन चव्हाण,मा.युवराज शिंदे(गुरुजी) मा.बाळासाहेब जगताप,मा.गणेश भोज,मा.नागेश गुंगे,मा.आण्णा शिवपुजे,नागेश गायकवाड चव्हाणवाडी व टेंभुर्णीतील आदी मान्यवर उपस्थित होते.
मा.आसिफ काझी आणि मा.नवनाथ नांगरे(गुरुजी) यांनी या निवडीचे अभिनंदन,कौतुक केले व आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा