जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री गणपती फार्मसी मध्ये वृक्षारोपण संपन्न
******************************
*टेंभुर्णी प्रतिनिधी /अमोल भोसले यास कडून*
टेंभुर्णी: अकोले खुर्द ता. माढा येथील श्री गणपती फार्मसीमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या तुकाराम महाराजांच्या पंक्तीतुन दिसुन येते की खरच वृक्ष हे आपले सोयरे आहेत.
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्याच दिवसाचे औचित्य साधून गणपती फार्मसीमध्ये प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मुलांच्या मनात पर्यावरणाविषयी आवड पर्यावरणाचे महत्त्व रुजविण्यात आले.
वृक्षाची आपल्याला खूप गरज आहे, आणि तुकाराम महाराजांनी ते खूप अगोदरच मानवाला पटवून दिलेले आहे तरीही पर्यावरणाचा ऱ्हास हा दिसून येत आहे आणि पर्यावरणाच्या ह्या वाढत्या ऱ्हासातुनच खुप सार्या पर्यावरणाशी तसेच मानवाच्या जीवनाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि ह्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. आज कोरोना सारख्या जागतिक महामारी चा सामना करताना, ऑक्सिजन चा तुटवडा, झाडांची कमतरता, या सगळ्यातून मानवाला एकच शिकवण मिळते ती म्हणजे "पर्यावरणाचे करा रक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण"
यावेळी गणपती फार्मसीत वृक्षारोपण करताना संस्थेचे सचिव डॉ. आर.डी.बेंदगुडे, अध्यक्ष विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे तसेच प्रा.स्वाती पाटील, प्रा.धनाजी माने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा