*जागतिक पर्यावरण दिननिमित्त तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे करण्यात आले वृक्षारोपण*
सलगरा / प्रतिनिधी - प्रतिक भोसले
जागतिक पर्यावरण दिननिमित्त ५ जुन रोजी तालुक्यातील सलगरा दिवटी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात उपसरपंच प्रशांत लोमटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी डॉ संदीप कोरेकर, तात्या केदार, ज्ञानेश्वर बोधने, प्रा.अनिल लोमटे, प्रशांत मुळे व देवानंद माळी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा