छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेशजी गवळी यांचा वाढदिवस साजरा
तुळजापूर येथे दिनांक 27 जून 2021 रोजी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांचा वाढदिवस तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण असो वा श्री तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी प्रयत्न असो वा तुळजाई नगरीतील बहुप्रतिकक्षित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा आंदोलन लॉकडाऊन मुळे होणारी व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान बाबत प्रशासन किंवा राजकीय नेत्यांशी संवाद करत सातत्याने पाठपुरावा करणारे सर्वश्रुत नेतृत्व म्हणून महेश गवळी यांच्या रूपाने तालुक्याला लाभले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद दादा कंदले यांनी केले, तर आभार सचिन ताकमोगे यांनी मानले, यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, पत्रकार श्रीकांत कदम, गोविंद खुरुद, प्रदिप अमृतराव, सचिन ताकमोघे,जेष्ठ पत्रकार गुरुनाथ बडूरे, संजय गायकवाड,अनिल आगलावे,रुपेश डोलारे,अक्षय डोलारे, संजय खुरुद,कुमार नाईकवाडी,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा