Breaking

रविवार, २७ जून, २०२१

सामाजिक न्याय दिवस म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी


सामाजिक न्याय दिवस म्हणून छत्रपती राजर्षी
 शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
टेंभुर्णी प्रतिनिधी
  न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी येथे राजषीशाहू महाराज यांची जयंती पर्यवेक्षक महादेव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहातसाजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक रामलिंग बरबडे यांनी केले. राजश्री शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी प्रथम आरक्षणाचा मुद्दा समाजासमोर मांडला यातूनच सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावे आणि सर्वांचा विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून शाहूमहाराजांनी समाजातील सर्व घटकांसाठी महान असे कार्य केले. समाजातील अस्पृश्य आणि महिलांसाठी सुद्धा त्यांनी समाज उन्नती चे कार्य केले म्हणूनच शाहू महाराजांची जयंती हे सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी केली जाते असे उदगार प्रशालेचे पर्यवेक्षक महादेव भुजबळ यांनी व्यक्त केले.
 या कार्यक्रम प्रसंगी शंभू शिंदे सुनील मिरगणे, अमोल डायर, पोपट मोरे, देशमुख मॅडम, उबाळे मॅडम, चव्हाण मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महादेव पवार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा