Breaking

मंगळवार, २९ जून, २०२१

सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी जिनत कोहिनूर सय्यद यांची निवड*


*सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी जिनत कोहिनूर सय्यद यांची निवड*
तुळजापूर  - महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सरपंच सौ. जिनत कोहिनूर सय्यद यांची परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सचिव सौ.मंदाकिनी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे.
सौ.जीनत सय्यद या मागील 6 वर्षा पासुन सरपंच आहेत,गावपातळीवर केलेली सार्वजनिक कामे, सरपंच असो वा ग्रामपंचायत सदस्य यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने प्रशासन व राज्य सरकारकडे मागणी करत केलेला पाठपुरावा आदी कार्याची दखल घेत त्यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे,या निवडीनंतर सुजित हंगरगेकर, किरण व्हरकट, बाळासाहेब जेवे, प्रियंका रंनबागुल,सतीश सोंने, संजय असलकर, दिपक माळी,जयसिंग बोराडे,विशाल ढगे, पंकज चव्हाण, अतिक शेख, अशोक गायकवाड
चरनेश्वर पाटील,नितीन चव्हाण यांच्यासह राज्य कार्यकारणी सदस्य कोहिनूर सय्यद यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा