Breaking

मंगळवार, २२ जून, २०२१

तुळजापूर येथील शिवभक्त श्री राज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडकडे रवाना*


*तुळजापूर येथील शिवभक्त श्री राज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगडकडे रवाना*
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तिथी प्रमाणे राज्यभिषेक निमित्त शिवबाराजे प्रतिष्ठाण च्या वतीने मागिल दहा वर्षापासुन महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीच्या पुण्य पावण नगरीतुन श्री कल्लोळ तिर्थ श्री गोमुख तिर्थातील पवित्र कुंडातिल जल पाणी, देविची कवड्याची माळ हळद कुंकू घेऊन जातात .तसेच प्रती वर्षा प्रमाणे या ही वर्षी श्री किल्ले रायगडावर होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी तुळजापुर येथुन तुळजा भवानी देविच्या पवित्र कुंडातुन जल,कवड्याची माळ हळदी कुंकू घेऊन रायगडाकडे प्रस्थाण करण्यात आले या वेळी . 
 पवित्र जल कुंबाची मंदीरा समोर पुजा आरती करण्यात आली. यावेळी अर्जुन आप्पा साळुंके, विकास वाघमारे,नितीन जट्टे,विकास शेटे,कृष्णा जितकर,स्वराज तेलंग, रोहित नागनाथराव चव्हाण,ओंकार पवार, अंबादास देशमुख, प्रतिक अंबुरे ,साई वाकुडे, गणेश घुगे,विशाल मगर,अकाश नाईकवाडी,आशुतोष माने, शिवभक्त उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा