Breaking

गुरुवार, १७ जून, २०२१

प्रज्ञा शोध परिक्षेत वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचे घवघवीत यश


*प्रज्ञा शोध परिक्षेत वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचे घवघवीत यश*

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

         डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षा ( एन.टी.एस.ई ) सन २०२० / २१ मध्ये छ्त्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूजचे छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशामध्ये आदित्य बोराटे (१६६ ), अशुतोष शिंदे ( १५६ ), सिद्धांत चिंचकर ( १५० ), उज्ज्वला खाडे ( १४८ ), अनुजा कोळेकर ( १४८ ), ईशा गावडे ( १४६ ) या सर्व विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. 
     या विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर ( एन.टी.एस.ई ) परिक्षेसाठी निवड झाले बददल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सचिव व्ही.आर.गोडसे, विकास अधिकारी आर.एन.घाडगे, मुख्याध्यापक डी.एन.जाधव, उपमुख्याध्यपक ए.बी.खरात, पर्यवेक्षक बी.बी.राऊत व एम आर गोडसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संचालक, सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा