Breaking

बुधवार, १६ जून, २०२१

*रेडा *ग्रामपंचायत ग्रामसेवक ** *दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस* *मिळवा* .


*रेडा *ग्रामपंचायत ग्रामसेवक ** *दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस* *मिळवा* . 
प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के

रेडा गावातील ग्रामसेवक  व तलाठी कार्यालय मध्ये राहणे बंधनकारक  आहे.

सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय नात्याने ग्रामसेवक, कृषी सहाय्यक ,तलाठी ,व यावर नियंत्रण असणारे जबाबदार आहेत,

यास ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जबाबदार आहेत, याकडे कोण लक्ष देणार,

गेल्या पंधरा दिवसांपासून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारे कर्मचारी म्हणजेच  ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी 
गावात अद्याप पर्यंत दिसून आलेले नाहीत, तसेच यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना झालेल्या दिसून येत नाहीत,
याबाबत असे निदर्शनास आले व याबाबत ग्रामस्थांमध्येही चर्चा ऐकायला मिळत आहे,

रेडा ग्रामपंचायतीचा 14वा वित्त आयोगाचा लाखो  रूपयांचा निधी  
ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून असताना यास जबाबदारी असणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी त्यांना गावाच्या कामकाजासाठी वेळ देता नाही,

रेडा गावाच्या विकासाबाबत काहीही देणे घेणे नसल्यासारखे सर्व संबंधित अधिकारी वागत आहेत. ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना ,
वरील सर्व नियमांना तिलांजली देत मनमानी पद्धतीने वागत आहेत,

या वरील सर्व गोष्टींचा विचार करून रेडा गावातील  करोणा महामारी रोखणे, तसेच या गावास    विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्व  अधिकाऱ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,
अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने माननीय गट विकास अधिकारी, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सो यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार असल्याचे विचार प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विचार व्यक्त केले,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा