Breaking

सोमवार, १४ जून, २०२१

पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन - डॉ.सुनिल काटकर*खटाव तालुका संघटना आंदोलनात सहभागी होणार.



*पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन - डॉ.सुनिल काटकर*
खटाव तालुका संघटना आंदोलनात सहभागी होणार.  

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्या संदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी २ मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशूसंवर्धन आयुक्तांची हि भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत संघटनेने मंगळवार दि.१५ पासून विविध टप्प्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे. पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने ११ मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावर चर्चा करीता पशूसंवर्धन आयुक्तांकडून नियंत्रण अपेक्षित होते. परंतु आयुक्तांकडून या निवेदनाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकारींनी सोमवार ७ रोजी पशूसंवर्धन आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. यावेळी देखील ११ पैकी २ मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली.
          संबधीत कार्यालयाची हि भूमिका पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या विरोधी आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप संघटनेने या पार्श्वभूमिवर केला आहे. कोरोनाचा पार्श्वभूमिवर आंदोलनाच्या माध्यमातून पशू पालकांना वेठीस न धरता चर्चेतून या समस्येचे निराकरण व्हावे अशी अपेक्षा संघटनेला होती. परंतु प्रशासनाने मागण्यांची कोणतीच दखल न घेतल्यानें संघटनेने मंगळवार दि.१५ पासून विविध टप्प्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवार दि. १५ पासून लसीकरण, सर्व प्रकाराची ऑनलाईन मासिक, वार्षिक अहवाल देणे बंद, या सोबतचा आढावा बैठकांना देखील संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत. शुक्रवार दि.२५ पासून राज्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्य यांना निवेदन देत मागण्याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्यात १६ जुलैपासून कायदयाप्रमाणे काम केले जाईल. त्या सोबतच सर्व शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय देखील संवर्गातील सदस्यांनी घेतला आहे. प्रशासनाकडून त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पशूचिकित्सा व्यवसायी संघटनेने पत्रकाद्वारे दिला आहे.
            संघटनेचे राज्य अध्यक्षा डॉ.सुनिल काटकर, सरचिटणीस डॉ.एम.पी.कानोले, कार्यध्यक्षा डॉ.डी.आर.चौधरी, कोषाध्यक्ष डॉ.पवन भागवत यांनी या संदर्भातील निवेदन आयुक्तांना व ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना दिले असून या आंदोलनात खटाव तालुका पशु चिकित्सा व्यवसायी संघटना सहभागी होणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी यांनी म्हटले  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा