*भोकरदन तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोयाबीन पेरणी यंत्राचा शुभारंभ...*
*जालना प्रतिनिधी मनीषा मगरे यास कडून*
भोकरदन:/भोकरदन येथील साबळे फार्मर प्रोड्युसर कंपनी ने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांच्या मार्गदर्शनखाली रुंद सरी वरंबा पद्धत (बी.बी.एफ) सोयाबीन पेरणी यंत्र खरेदी केले आहे. याचा आज ११ जून शुक्रवार सकाळी अकरा वाजता कृषी अधिकारी कार्यालय भोकरदन येथे शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान,रुंद सरी वरंबा पद्धत (बी. बी.एफ) सोयाबीन पेरणी यंत्राने पेरणी केल्यास २५ ते ३० टक्के उत्पादनात वाढ होवून बी- बियाणे,खते, औषधी ची ५० टक्के बचत देखील होणार आहे. साबळे फर्मर प्रोडुसर कंपनी भोकरदन यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना
भाडे तत्वावर देण्यात येणार असल्याचे चेअरमन काकासाहेब साबळे यांनी सांगितले.
यावेळी भगवान सुरडकर, ज्ञानेश्वर दुर्गुडे, श्रीकांत इंगळे, कृषी साह्यक प्रवीण भोपळे,तालुका तंत्रज्ञान आत्मा चे धैर्यशिल पाटील ,काकासाहेब साबळे, शेतकरी अप्पासाहेब साबळे, कौतिक राव सबळे, विष्णु बर्डे, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा