*राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र बोरगावकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय*
तुळजापूर :- येथील राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ नेते व बालाघाट शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांचा दि.13 जून रोजी होणारा 85 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांनी सर्व ठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव पाहता
हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. त्याकारणाने वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ता,हितचिंतक, नातेवाई ,समर्थक आणि मित्रपरिवाराने आपल्या घरी राहून शुभेच्छा द्याव्या.
आपण आपल्या कुटुंबा सोबत घरी रहावं,घरा बाहेर पडू नये तसेच मास्क वापरावा असे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा