राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये आदित्य लोंढे याचे दैदिप्यमान यश---
वेणेगाव प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी या शाळेतील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य शशिंगर लोंढे या विद्यार्थ्याने आर्थिक दुर्बल प्रवर्गातून राज्यात बारावा (१२) येण्याचा मान मिळविला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत १३ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (राज्यस्तर) घेण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून इयत्ता दहावीतील एकूण ९४३११ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते. या परीक्षेच्या राष्ट्रीय स्तरावरील होणार या परीक्षेसाठी आदित्य ची निवड झालेली आहे. ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत घेण्यात येते. आदित्य लोंढे या विद्यार्थ्याची आर्थिक दुर्बल प्रवर्गातून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा राष्ट्रीय स्थर यासाठी निवड झालेली आहे ही अतिशय आनंदाची आणि भूषणावह गोष्ट असून यामुळे न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी च्या गुणवत्तेत मानाचा तुरा ठरले आहे. आदित्यला २०० पैकी १५४ गुण मिळालेले आहेत. त्याला प्रशालेतील जी एन अवघडे , एम एस भुजबळ, के एस गायकवाड एम आय पवार, पी बी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. माननीय बाळासाहेब पाटील जनरल बॉडी सदस्य, परमेश्वर मामा देशमुख, वसंत तात्या येवले पाटील तसेच डी टी गोंजारी मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरातून आदित्यवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या अगोदर त्याने अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीतयश मिळविले मिळविलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्याचा आदर्श विद्यार्थी म्हणूनही गौरव केलेला आहे. अशा या विद्यार्थ्याचे कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे यासाठी तो अगदी लहानपणापासूनच स्पर्धा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा