Breaking

मंगळवार, १५ जून, २०२१

टेंभुर्णी येथे माढा तालुका प्रहार पदाधिकार्‍यांच्या निवडी संपन्न **माढा तालुक्यात शेकडो युवक तरुणांचा प्रहार मध्ये प्रवेश.* *प्रहार जिल्हा युवा उपाध्यक्षपदी गणेश पवार तालुका युवा अध्यक्ष पदी अमोल सुळे,तालुका युवा उपाध्यक्षपदी रणजीत पाटील यांची निवड करण्यात आली.*


*माढा तालुका प्रहार पदाधिकार्‍यांच्या निवडी टेंभुर्णी येथे पडल्या पार*
*माढा तालुक्यात शेकडो युवक तरुणांचा प्रहार मध्ये प्रवेश.*
   *प्रहार जिल्हा युवा उपाध्यक्षपदी गणेश पवार तालुका युवा अध्यक्ष पदी अमोल सुळे,तालुका युवा उपाध्यक्षपदी रणजीत पाटील यांची निवड करण्यात आली.*
  सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षाच्या काळात प्रहार संघटनेचे ऐका छोट्याशा रोपट्याचा एक मोठा वटवृक्ष झाला आहे महाराष्ट्राचे लोकनायक महाराष्ट्र राज्य मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या सेवा त्यात समर्थन संघर्ष या विचारांची मशाल घेऊन जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात अनेक तरूण जिल्ह्यात प्रहार संघटनेचे सामील होत असून जवळजवळ जिल्ह्यात 400 च्यां आसपास प्रहारच्या शाखांचे गेल्या चार वर्षात ओपनिंग झाले आहे.
    आज माढा तालुक्यात प्रहार चे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा उपप्रमुख रमेश पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी प्रहार मध्ये प्रवेश केला,आणि या वेळी प्रहार संघटनेच्या माढा तालुक्याच्या काही पदाधिकाऱ्यांची निवड ही करण्यात आली यावेळी सुरली गावचे युवक नेते गणेश पवार यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच सापटणे गावचे युवक नेते अमोल सुळे यांची माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या युवा तालुकाध्यक्षपदी व अकोले गावचे युवक नेते रणजित पाटील यांची माढा तालुका युवा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
   यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले लोकनायक बच्चुभाऊ कडू हे महाराष्ट्रातील युवकांचे आयडॉल आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जे काम मग ते शेतकरी असोत शेतमजूर असोत दिव्यांग आसोत समाजातील कोणताही दुर्लक्षित घटक असू द्या त्यांच्यासाठी उभे राहिले सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक प्रहार सैनिक अतिशय प्रामाणिकपणे सेवा त्याग समर्पण संघर्ष या भाऊंच्या विचारप्रणाली ची मशाल घेऊन निस्वार्थी भावनेतून घराघरात सेवा देत असून येथून पुढे येणाऱ्या काळात सुद्धा प्रहार संघटना ही जिथे अन्याय तिथे प्रहार या उक्तीप्रमाणे काम करत राहणार आणि या वर्षभराच्या काळात जिल्ह्यात अजून चारशेच्या आसपास शाखा प्रहार च्या माध्यमातून उघडण्यात येणार असे त्यांनी सांगितले.
  यावेळी जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे प्रहारचे माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी,बंडू मुळे सागर लोकरे सचिन लोकरे योगेश घाडगे निलेश पाटील समाधान पवार दिलीप पवार दत्ता घाडगे हनुमंत पवार सुहास कोरडे नवनाथ सुळे अमोल पवार गोकुळ भानवसे पांडुरंग पवार गणेश पाटील आनंद पाटील किरण पाटील तुषार आर किले कृष्ण भानवसे अनेक शेतकरी व युवक उपस्थित होते.

*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा