*सुकाळे फाउंडेशन व परिवार तर्फे महाड कोविड सेंटरला 30000 चा धनादेश देऊन मदत*
पोलादपूर प्रतिनिधी/शैलेश पालकर
महाड नगरपालिका, लोकविकास सामाजिक संस्था व महाड प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने संचालित असलेल्या महाड कोविड सेंटरसाठी सुकाळे फाउंडेशन महाड तर्फे रू 30000 चा धनादेश अर्पण आला.
कोविड महामारीच्या दुसर्या लाटेमध्ये महाडकर नागरिकांच्या मध्ये हाहाकार निर्माण झाला. अश्या कठीणप्रसंगी माजी आमदार मा. श्री माणिकराव जगताप ह्यांच्या अथक प्रयत्नाने निर्माण झालेल्या कोविड सेंटरमुळे जनसामान्यांची होणारी परवड थांबली आहे. सदरहू कोविड सेंटरच्या मदतीसाठी खारीचा वाटा समजून सुकाळे फाउंडेशनतर्फे अल्पशी भेट देण्यात आली.
श्री. हनुमंत जगताप ह्यांच्या उपस्थितीत श्री. विनायक सुकाळे, निवृत्त फॉरेस्ट रेंजर श्री. अनंत सुकाळे, डॉ. राहुल सुकाळे, सुकाळे मेडिकलचे संचालक श्री. सचिन सुकाळे, निर्मल मेडिकलचे संचालक श्री. अभिषेक सुकाळे ह्यांनी धनादेश प्रदान केला.
पत्रकार श्री. अप्पा बाळ,श्री.मनोज खांबे व श्री. रवि शिंदे ह्यांची विशेष उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा