Breaking

रविवार, २७ जून, २०२१

माझी उपजिवीका समृद्धी मोहीम व माझी पोषण परसबाग विकसन मोहीम समारंभ,


माझी उपजिवीका समृद्धी मोहीम व माझी पोषण परसबाग  विकसन  मोहीम समारंभ,  
जालना प्रतिनिधी,  मनिषा मगरे  

उमेद - ग्राम विकास विभाग अंतर्गत राज्यातील गावोगावी महीला बचत गटांच्या माध्यमातून माझी उपजीविका समृद्धी मोहीम  व माझी पोषण परसबाग पोषण विकसन मोहीम,     १५ जुन २०२१ ते १५ जुलै २०२१ 
या काळात राबविण्यात येत आहे ,  
या माध्यमातून आरोग्य सोबतच  महीलांना कुटुंबासाठी आर्थिक  हातभार देखिल लागणार आहे. 
 त्या अनुषंगाने उमेद-  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत  महिला बचत गटांच्या माध्यमातून,  जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील,   घनसावंगी  अंबडल,  बदनापूर,  मंठा,  परतुर, या आठही तालुक्यातील, गाव पातळीवर, माझी उपजीविका समृद्धी मोहीम, व माझी उपोषण परसबाग विकसन, मोहीम राबवण्यात येत आहे.
 या मोहिमेत अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात,  महीला बचत गट, यांच्या मार्फत दहा सेंद्रिय पोषण परसबाग तयार केल्या जात आहेत. 
कृती - नारी शक्ति प्रभाग संघ राजुर गणपती, यांच्या माध्यमातून उत्कृष्ट सेंद्रिय परसबाग तयार करण्यात येत आहे.
या तयार केलेल्या परसबागा मधुन मिळणाऱ्या वेगवेगळ्या ताज्या,  
सेंद्रिय भाजीपाला हा त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी वापरण्यात येईल,  सोबत गर्भवती महिला, स्तनदा माता, लहान व किशोरवयीन मुला - मुलींना आहारातुन विविध पोषणमुल्ये मिळावीत व ह्या भाजीपाल्याच्या विक्रीतुन कुटुंबाला आर्थिक लाभ होईल,  हे या अभियानाचे दोन मुख्य उद्देश  आहेत.
सर्व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,  यांच्या माध्यमातून बीजप्रक्रिया बिज,  उगवण क्षमता प्रत्यक्षीक पोषण बाग आखणी व प्राण्यांचे लसीकरण,  एकत्रीत बि बियाणे खरेदी अशा प्रकारे 
उपजिविकेचे स्त्रोत गाव पातळीवर,  या हंगामात राबविण्यात येत आहेत,  
या मोहीम यशस्वी करण्यासाठी,  अध्यक्ष - मिराताई पुंगळे, 
प्रभाग व्यवस्थापक - मिराताई शेरे 
ICRP सविता ताई वानखेडे,         बेबी लोनकर,  सुजता बोर्डे, 
सुजाता डवले,  यांनी आव्हान केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा