Breaking

शनिवार, १२ जून, २०२१

कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी मिळणे बाबत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना निवेदन*


**कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी मिळणे बाबत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना निवेदन*
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार मा. ओमराजे भुपालसिंह राजे निंबाळकर साहेब यांना कोचिंग क्लासेस टीचरस फेडरेशन ऑफ उस्मानाबाद तर्फे कोचिंग क्लासेसला 50 % विद्यार्थी क्षमतेने क्लासेस सुरू करण्यासाठी निवेदन सादर. मा.खासदार साहेबांनी तात्काळ मा. जिल्हाधिकारी साहेबांशी दूरध्वनी वरून संपर्क करून क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी सुचना देण्यात आली. धन्यवाद कर्तव्यदक्ष खासदार साहेब. यावेळी कोचिंग क्लासेस टीचरस फेडरेशन, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष श्री अप्पासाहेब सुरवसे सर, श्री.एस. आर. मठे सर, श्री मंगेश व्हनमाने सर, श्री महेश गुरव सर,  श्री रवी गवळी सर, श्री अमोल पवार सर, तानाजी सोनवणे सर  आदी पदाधिकारी उपस्थित होते.
,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा